आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळ सप्ताह:तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात क्रीडा सप्ताहास प्रारंभ

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवारी (दि.१) क्रीडा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सशक्त भारत अंतर्गत आयोजित खेळ सप्ताहाचा ७ डिसेंबर रोजी समारोप होणार आहे. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

सप्ताहात १०० मीटर, २०० मीटर, ८०० मीटर धावणे, लांब उडी, ऊंच उडी, थाळीफेक, गोळा फेक या वैयक्तिक स्पर्धा तसेच खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, हँडबॉल, बॅडमिंटन आदी सांघिक खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा कनिष्ठ मुले व वरिष्ठ मुले या गटांत होणार असून मुले व मुलींची स्पर्धा स्वतंत्र होणार आहे. प्रथम येणारा संघ व खेळाडूंना प्रमाणपत्र, बक्षीस देण्यात येणार आहे. सप्ताहासाठी वक्रीडा शिक्षक आर. एम. अलसेट व एस. आर. अलसेट परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...