आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधाराशिव मंुबई-पुणे, ठाणे, धाराशिव आणि वाशिम या पाच जिल्ह्यांत गेल्या महिनाभरात वाढलेली कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनल्याने आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्याला पत्र पाठवून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसली तरी कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देण्याच्या सूचना दिल्या . राज्यात ५ जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो की काय, अशी भीती निर्माण होत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, धाराशिव आणि वाशिम या पाच जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला. या जिल्ह्यांसाेबतच सर्वच जिल्ह्यांना आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रुग्णांच्या संपर्कातील प्रत्येकी २० जणांच्या तपासण्या कराव्यात, असे सांगण्यात आले आहे.
एकाच दिवशी १९८ रुग्णांची नोंद आरोग्य संचालकांनी पत्रात म्हटले आहे की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना प्रादुर्भाव वाढत असून हे चिंताजनक आहे. कोरोना नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या चार आठवड्यांत राज्यातील प्रकरणांत दुप्पट वाढ झाली. मुंबई, पुणे, ठाणे, वाशिम आणि धाराशिवमध्ये सर्वाधिक पॉझिव्हिटी दर आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासण्या वाढवाव्यात. त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करावे. लसीकरणावर भर द्यावा. एक मार्च रोजी राज्यात एकाच दिवशी १९८ रुग्ण आढळले, हे चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू उमरगा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र कुणालाही गंभीर लक्षणे नाहीत. त्यामुळे रुग्णांना घरातच आयसोलेट केलेले आहे. औषधांची मुबलक उपलब्धता आहे. कोरोना रुग्णांसाठी गरजेनुसार स्वतंत्र विभाग तयार केले जात आहेत. - डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर द्यावा भर अँटिजेनमध्ये निगेटिव्ह, आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह राज्याच्या आरोग्य संचालकांनी सर्व जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणेला ८ मार्चला पत्र पाठवले. त्यात सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, आरोग्य प्रशासनाच्या सूचनेनंतर तपासण्या वाढवण्यात येत आहेत. मात्र अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या तपासण्या आरटीपीसीआर तपासणीत मात्र पॉझिटिव्ह आढळत आहेत. उमरगा तालुक्यात हे प्रकर्षाने आढळून आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.