आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एसटीचे तिकीट यंत्र खराब; नवीन वाहकांची अडचण

उस्मानाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल १२ वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून बंद असलेले तिकिटाचे ट्रे आणि मॅन्युअली फाडावे लागणारे तिकीट पहिल्यांदाच बघून मुलांना कुतूहल वाटले. दुसरीकडे आधुनिक इटीएम यंत्रात बिघाडाने प्रवासात असे तिकीट फाडण्याचे काम करावे लागत असल्याने नवीन वाहकांची अडचण होत असल्याचे चित्र सध्या निम्म्या बसेसमध्ये दिसून येत आहेत.

२००९ मध्ये महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीशी करार करुन इटीएम यंत्राने तिकिट देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र, संपामुळे या यंत्राकडे दुर्लक्ष झाले. गेल्या काही आठवड्यापासून जिल्ह्यातील एक हजार यंत्रांपैकी चारशे पेक्षा जास्त यंत्र खराब झाले आहेत. त्यामुळे तितके जुने सांधीमध्ये ठेवलेले तिकिट ट्रे बाहेर काढले आहेत. त्यातून आता प्रवाशांना तिकिट देण्यात येत आहेत.

त्यामुळे आता जुन्या प्रवाशांना एका तिकिटाची सवय लागलेल्यांना आता पुन्हा दोन पेक्षा जास्त तिकिटांचा गठ्ठा सांभाळावा लागत आहेत. औरंगाबाद ते उस्मानाबाद असा प्रवास करणाऱ्या एक फूल आणि दोन हाफ या सातशे ३५ रुपयांचे ११ तिकिटे जमा करुन सांभाळावी लागली. विशेष म्हणजे हे सांभाळण्याची मोठी कसरती प्रवाशांना करावी लागत आहेत. त्यात आता पुन्हा बसेसच्या तपासणीची मोहीम सुरु झाल्याने चांगलीच तारांबळ होत आहे.

अद्यापही यंत्र मुंबईतच
ज्या यंत्रांमध्ये बिघाड झाले आहेत, असे यंत्र जिल्ह्यातून मुंबईत कंपनीकडे दुरुस्तीसाठी गेल्या महिन्यात पाठवले आहेत. अद्यापही ही यंत्र मुंबईतच असून परत आणले नाही. त्यामुळे त्याजागी जुने तिकिट ट्रे बाहेर काढावे लागले आहेत. त्यामुळे नवीन भरती झालेल्या वाहकांना ही किचकट कामे करण्यासाठी मोठी अडचण येत असल्याचे समोर आले आहेत.

दुरुस्तीसाठी पाठवले
संपापासून यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड दिसून येत आहेत. जी यंत्र चालू आहेत, अशा यंत्रांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये पाठवत आहोत. तसेच जे जुनी ट्रे आहेत, त्यांना मध्यम आणि कमी वर्दळ असलेल्या मार्गावर पाठवत आहोत. यंत्र कधी सुरु होऊन परत येईल हे आताच सांगता येत नाही. त्यामुळे नवीन वाहकांना तिकिट ट्रे आणि तिकिट वाटपाचे प्रशिक्षण आगारात जुन्या लोकांकडून देत आहोत. अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक.

बातम्या आणखी आहेत...