आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:शेत रस्त्यावरून देवळालीत कोयत्याने मारहाण; भूम तालुक्यातील देवळाली येथील घटना, दोन्ही गटावर गुन्हा दाखल

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील देवळाली येथील निलेश शिंदे, शुभम तांबे, सुनिल तांबे यांनी शेतरस्ता बंद करायला लावल्याच्या संशयावरून गावातील नदीजवळ २ जून रोजी रात्री नऊ वाजता भाऊबंद- काकासाहेब श्रीहरी तांबे यांना शिवीगाळ करुन निलेश यांनी हातोडीने तर सुनिल यांनी कोयत्याने मारहाण केली. यात काकासाहेब यांचा उजव्या पायाचे हाड तीन ठिकाणी मोडले.

डाव्या पायाचे बोट तुटून ते गंभीर जखमी झाले. यावेळी काकासाहेब यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पित्यास ही नमूद तिघांनी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. याच प्रकरणी देवळाली येथील सुनिल बब्रुवान तांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाऊबंद- श्रीहरी गणपत तांबे व काकासाहेब या दोघा पिता- पुत्रांनी सुनिल यांचा मुलगा- शुभम यांस दोन रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास विष पाजल्याने सुनिल हे शुभम यास औषधोपचारासाठी गावातील नदी जवळील रस्त्याने घेउन जात होते.

यावेळी श्रीहरी व काकासाहेब यां दोघांनी सुनिल शेत विकत नसल्याच्या कारणावरून सुनीलची दुचाकी अडवून शिवीगाळ केली. तसेच कोयता व दगडाने मारहाण करुन सुनिल व शुभम यांना गंभीर जखमी केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात तक्रार असून पोलिसांनी दोन्ही गटावर गुन्हे दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...