आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र अपघात विभाग सुरू करा; रुग्ण कल्याण समितीची तहसीलदारांकडे मागणी

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र अपघात विभाग व ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी रुग्णकल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले यांनी केली आहे.

तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णकल्याण समितीची बैठक झाली. या बैठकीत समितीचे अशासकीय सदस्य आनंद कंदले यांनी रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी लावून धरली. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेची गरज व्यक्त केली. या शिवाय जुन्या अॅम्ब्युलन्सची शववाहिका तयार करावी तसेच रुग्णालयात प्रसूती होऊन जन्माला येणाऱ्या बालिकांच्या स्त्री-जन्माचे स्वागत म्हणून मुलींना रुग्णालयाच्या वतीने चांदीचे पैंजण घालून मातेचा सत्कार करण्याची मागणी कंदले यांनी केली.

बैठकीला सिव्हिल सर्जन डॉ. सचिन बोडके, रुग्णालय अधीक्षक डॉ. राहुल वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार, डॉ. श्रीधर जाधव, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, बांधकाम विभागाचे अभियंता विवेक देशमुख, नियोजक गवळी, डॉ. शेख इलियास, चोरमले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...