आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरण कंपनीकङून ईटसह परिसरातील १३-१४ गावाना वीजपुरवठा केला जातो.येथूनच पखरूड,जोतीबाचीवाडी या गावांना ही वीज पुरवठा केला जातो.या पखरूड फिडरवरच ईट मधील निम्म्या भागाला विज पुरवठा केला जातो.यामध्ये शिक्षक काॅलनी, ईट जातेगाव रोड सर्कल,जिल्हा परिषद शाळा शेजारील भाग या ठिकाणी इरिगेशन डी पी वरून वीज पुरवठा केला जातो.
मात्र हा विज पुरवठा कमी दाबाने मिळत होता.तर या फिडरचा सतत विज पुरवठा खंडित होत होता.यामुळे या डी पी वरील नागरिकाना या दोन मोठ्या समस्याचा सामना गेल्या दोन वर्षा पासून करावा लागत होता. या ठिकाणी नवीन डी पी ची मागणी मागील दोन वर्षा पासून येथिल नागरिकाकङून केली जात होती.त्यासाठी येथील नागरिकाकङून महावितरण,लोकप्रतिनिधी याना पत्र व्यवहार करण्यात आले.या मागणीमुळे याठिकाणी तीन २५ एच पी चे काॅन्ड मंजूर करण्यात आले होते.त्याचे कामही सुरू करण्यात आले.
मात्र निम्मे काम करून हे काम बंद झाले.या ठिकाणी पोल व तारा ही ओढण्यात आल्या मात्र बाकीचे काम करण्यात आले नाही.” तीन महिन्यापासून विदुयत खांब शोभेची वस्तू ,उच्च दाबाने वीजपुरवठ्याची प्रतिक्षा संपेना “ या मथळ्या खाली दिव्य मराठीत बातमी प्रसिद्ध होताच संबधित महावितरण कंपनी कडून अर्धवट राहिलेल्या कामाना आता सुरूवात करण्यात आली असून येथील नागरिकाना येणाऱ्या दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण होउन उच्च दाबाने व सुरळीत वीज पुरवठा मिळणार आहे. खंडित वीजपुरवठयामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठयासाठी बराच त्रास व नुकसान सहन करावे लागते.
अनेकदा अर्ज केला होता महावितरण कंपनी ईटहून पखरूड व जोतीबाचीवाडी आदीसह इतर गावाना वीजपुरवठा केला जातो.पखरूड फिडरवर ईट मधील अर्ध्या गावांना वीज पुरवठा केला जातो.हा वीजपुरवठा इरिगेशन डी.पीवरून केला जातो.मात्र हा विज पुरवठा अत्यत कमी दाबाने केला जातो. तसेच या फिडरवर सततचा विज पुरवठा खंडित होतो.येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी व उच्च दाबाने वीजपुरवठा मिळावा यासाठी नागरिकानी अनेक वेळी महावितरण कंपनी कडे तोंडी व लेखी स्वरुपात करण्यात आले. मात्र त्याकडे अनेक वेळा संबधित विभागाकङून दुर्लक्ष करण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.