आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताहास सुरुवात:लोहाऱ्यात शिवनाम सप्ताहास सुरुवात

लोहारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा शहरातील सदाशिव हिरेमठ संस्थान येथे रविवारी (दि.४) शिवनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. या सप्ताहात शिवपाठ, अभिषेक, श्री परामराहस्य पारायण, भजन, कीर्तन, शिवजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ४ डिसेंबर रोजी सकाळी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह शहरातील मान्यवरांच्या हस्ते पंचाचार्य पूजन, ध्वज पूजन, विना पूजन, टाळ पूजन, मृदंग पूजन, पेटी पूजन करण्यात आले.

शिवनाम सप्ताह व्यासपीठ प्रमुख शि.भ.प. शिवलिंगप्पा केराप्पा संगशेट्टी, शि.भ.प. भागवत बेळे महाराज आहेत. माहेश्वर मंडळात पंचय्या स्वामी, संगन्ना स्वामी, रामेश्वर स्वामी, बबन स्वामी यांचा सहभाग आहे. महादेवी मठपती, धनराज बुलबुले, भाग्यश्री शेरे-पाटील, लक्ष्मण विभुते, किर्तीताई हिरेमठ, विश्वनाथ स्वामी यांच्यासह इतरांची प्रवचने होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...