आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबा यात्रेस गुरूवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नंदीध्वज (काठ्या) मोठ्या संख्येने येण्यास सरुवात झाली आहे. विशेषत: उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातून काठ्या मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून फुलांच्या माळांनी मंदिर सजविण्यात आले आहे. ६ जानेवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. ५ जानेवारीपासूनच भाविक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात दाखल होत आहेत. ६ तारखेला ७०० काठ्यांसह ५ ते ७ लाख भाविक दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. येळकोट-येळकोट जय मल्हारचा जयघोष ढोल ताशांचा दणदणाट, झांजांच्या खणखणाटाने मंदिर परिसर दणाणून गेला आहे. भंडाऱ्याच्या उधळणीने तीर्थक्षेत्र श्री खंडोबा देवस्थान हळदीने माखले आहे.
पुजा,नवस, दंडवत, भंडारा उधळण यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. यात्रेमध्ये मौत का कुआ, घसरगुंडी, खेळणी, भांडी, मिठाई आदींसह लहान मुलांच्या करमणुकीची दुकाने मोठ्या दाखल झाली आहेत. यात्रेसाठी नगरपालिका, पोलीस प्रशासन, महावितरण विभाग, एसटी महामंडळ व मंदिर समिती सज्ज झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.