आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटना व उस्मानाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यातील ४१० खेळाडू सहभागी झाले आहेत.
येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू प्याटी, कोषाध्यक्ष प्रा. माधव शेजुळ, उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, पालघर जिल्हा सचिव राकेश सावे, शारीरिक शिक्षण महासंघ सोलापूरचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, जिल्हा हँडबॉल संघटनेचे सचिव कुलदीप सावंत, प्रा. शिक्षण संघटनेचे अध्यक्ष बिभीषण पाटील, महाराष्ट्र व्हॉलीबॉल टेक्निकल कमिटीचे अध्यक्ष संजय देशमुख, राजेश भवाळ, नागेश राजुरे, क्रीडा अधिकारी कैलास लटके, गुरुनाथ माळी, विवेक कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन संजय कोथळीकर तर आभार जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष भरत जगताप यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे राजू सोलकर, पवन वाटवडे, राजेश बिलकुले, अभय वाघोलीकर, प्रविण गडदे, अजिंक्य वराळे, ज्ञानेश्वर भुतेकर, अनिल भोसले, रोहित सुरवसे, अमोल कदम, प्रशांत बोराडे, ऋषी काळे आदी परिश्रम घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.