आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय पुरस्कार:साहित्यिक रमेश बोर्डेकर यांच्या कथा संग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

कळंब20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यिक रमेश बोर्डेकर यांच्या “दडपलेलं जीणं” या कथा संग्रहास मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कार औरंगाबाद येथून जाहीर झाला. रमेश बोर्डेकर यांचा “पोरके आभाळ “काव्यसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सास्कृती मंडळाने प्रकाशित केलेला आहे.तसेच “चला जावूया रातीच्या साळंला” ही लघु नटिका प्रौढ शिक्षण मंडळ औरंगाबाद कडून प्रकाशित केली आहे. त्यांच्या कवितेस अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून असून कवितांचे। हिंदीत अनुवाद झाले आहेत.”दडपलेलं जीणं” कथेचा डॉ. पी. डी. निमसरकर यांनी इंग्रजीतही अनुवाद केला आहे.

तुपेरे सरांची प्रस्तावना लाभली असून जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशीव यांनी पाठराखण केली आहे.साहित्यिक रमेश बोर्डेकर यांचे सामाजिक, शैक्षणिक,व धम्म कार्यात मोठे योगदानही आहे.त्यांचे “भर उन्हात चालतांना”(काव्यसंग्रह), प्रतिबिंब (काव्य संग्रह),समीक्षा ग्रंथ(२), व इतर लेखसंग्रह प्रकाशनाच्या प्रतिक्षेत आहेत. आपल्या साहित्यातून समाजातील विविध स्तरांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...