आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:हणमंत पडवळ यांच्या  काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोस्ती फाउंडेशन अहमदनगर आयोजित लोककलावंत पै. मजनूभाई शेख स्मृती गौरव पुरस्कार वितरण सोहळा श्रीरामपूर येथे शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी झाला. यावेळी हणमंत पडवळ यांच्या जगणे इथेच संपत नाही या कविता संग्रहाला पै.मजनूभाई शेख राज्य स्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.एस.एन.पठाण,माजी कुलगुरू नागपूर विद्यापीठ तथा उच्चशिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य तर उद्घाटक कवी बाबासाहेब सौदागर हे होते.कवी सुभाष सोनवणे, उप शिक्षणाधिकारी रमजान पठाण,पत्रकार रामदास वाघमारे, नाटयकलावंत वसुंधरा शर्मा, महिला कॉग्रेस सरचिटणीस डॉ.वंदना मुरकुटे ,प्रा. गुंफाताई कोकाटे उपस्थित होते. प्रास्तविक दोस्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रज्जाक भाई शेख यांनी केले. कवी हणमंत पडवळ यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे.

बातम्या आणखी आहेत...