आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:सरपंच सुनीता पावशेरे यांना राज्यस्तरीय सन्मान

उमरगा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील लोकनियुक्त सरपंच सुनीता पावशेरे यांचा औरंगाबाद येथे गुरूवारी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे सोहळ्यात कर्तबगार महिला म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांचे हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी राज्यातील विविध क्षेत्रातील २५ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. सुनिता पावशेरे यांनी सरपंच म्हणून अल्पावधीतच गावाचा सर्वांना सोबत घेत सर्वांगीण विकास केलेला आहे.

यावेळी पावशेरे यांनी मनोगत व्यक्त करुन ‘दिव्य मराठी’चे आभार मानले. यापूर्वीही नवी दिल्ली, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद येथे पावशेरे यांना आदर्श सरपंच म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावेळी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रणव गोळवेलकर, सुभाष बोंद्रे, रॉक बेंजामिन, सोलापूरचे युनिट हेट नौशाद शेख, विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला, देविदास पावशेरे, आसावरी पावशेरे, सविता स्वामी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...