आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:अंगुले यांना राज्यस्तरीय काव्यसम्राट पुरस्कार

जळकोटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कवी सूरज अंगुले राज्यस्तरीय काव्यसम्राट पुरस्कार प्रदान करण्यात आला. मैत्रा फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेमार्फत बीड येथे स. मा. गर्गे वाचनालयात ‘श्रावण शब्दगंध’ राज्यस्तरीय काव्य संमेलन घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील हिंदी कवी विशाल अंधारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एकनाथ मुंडे, परमेश्वर राठोड, लक्ष्मी अर्बन निधी लिमिटेड बीडचे अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द. ल. वारे उपस्थित होते. काव्य संमेलनात राज्यातील विविध कवींनी भाग घेत कविता सादर केल्या.

सूरज अंगुले यांनीही कविता सादर केली. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना काव्यसम्राट पुरस्कार देण्यात आला. यशस्वितेसाठी सविता ढाकणे, शिल्पा वाघमारे, संगीता आदमने, अश्विनी शिंदे, संजय राठोड, धर्मराज करपे, शिवराम राठोड, रंजना दाणे, वैशाली शिंदे, राजश्री ढाकणे, रमाताई गिरी, सुभद्रा खेडकर, कल्पना कोल्हार, महादेव डोरले, मोहन राठोड, धनवे बापू, शिवराम पवार, विशाल अंधारे, क्रांती भालेराव, संगीता कावळे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...