आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना राज्यस्तरीय महसूल आयकॉन पुरस्कार

परंडा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना राज्यस्तरीय महसूल आयकॉन २०२२ पुरस्कार जाहीर झाला. युगदर्शक आयकॉन पुरस्कार सोहळा बार्शी यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. तहसीलदार देवणीकर यांनी ११ वर्षांच्या सेवेत उस्मानाबाद येथे (परिविक्षाधीन नायब तहसीलदार), नायब तहसीलदार जळकोट, तहसील कार्यालय उदगीर, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व सध्या परंडा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देवणीकर यांनी २०१९ मध्ये-निवडणूक प्रशिक्षणासाठी (विधानसभा व लोकसभा) आवश्यक प्रशिक्षण व्हिडिओ प्रथमच मराठीत युट्युबवरवर तसेच पदवीधर मतदार संघाचे निवडणूक साहित्य प्रसारित केले होते. निवडणूक विषयक प्रशिक्षण साहित्य व्हिडिओच्या रुपात प्रत्येकाला सहज उपलब्ध करून दिले. या व्हिडिओचे लेखन, दिग्दर्शन व पार्श्वनिवेदन रेणुकादास देवणीकर यांनी केले आहे. देवणीकर साहित्यिक सुद्धा आहेत. त्यांनी रचलेल्या अनेक कविता गाजल्या आहेत. कवी मनाचे उत्कृष्ट अधिकारी ही त्यांची ख्याती आहे.

बातम्या आणखी आहेत...