आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड व राज्य उपाध्यक्ष सी. के. मुरळीकर यांनी कळंब येथील जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा संघटक नरहरी सोनवणे, परभणी जिल्हाध्यक्ष मुरली ठोंबरे, ॲड. गणेश गवळी मराठवाडा युवक अध्यक्ष, लातूर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दामावले यांचा सत्कार झाला.
प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड म्हणाले की, एकजुटीतून समाजाचा सर्वांगीण विकास होतो. सी. के. मुरलीकर यांनी संघटनेचे मुख्य कार्य, उद्दिष्ट, दिशा व मार्गाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ‘श्री संत रविदास महाराज घराघरात’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपक्रमांतर्गत सुरुवातीला बनवलेल्या संत रविदास महाराज यांच्या ३०० प्रतिमा भेट देण्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते झाली. येथील श्री संत रविदास महाराज मंदिराची पाहणी पाहुण्यांनी करत कामाची प्रशंसा केली. याप्रसंगी निवृत्त शाखा व्यवस्थापक रंगनाथ कदम, रुपचंद लोहकरे, डॉ. संजित पाखरे, सतीश कदम, दयानंद शिंदे, सुदाम शिंदे, पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.