आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:नियमाने वीज बिलासाठी निवेदन‎

लोहारा‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील जेवळीसह अनेक‎ गावातील सर्वसामान्य नागरिकांना‎ महावितरणकडून आव्वाचे सव्वा‎ वीज बिल आकारले जाते. त्यामुळे‎ सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या‎ प्रमाणात हेळसांड होत आहे.‎ त्यामुळे सुरळीत बिल आकारावे‎ अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या‎ वतीने बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात‎ आली.‎ दिलेल्या निवेदनात म्हटले की,‎ तालुक्यातील जेवळीसह अनेक‎ गावातील सर्वसामान्य नागरिकांना‎ वीज वितरण कार्यालयाकडून‎ आव्वाचे सव्वा बिल आकारले जात‎ आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातील‎ नागरिकांना घरामध्ये कुठल्याही‎ प्रकारचा वापर नाही. दोनच व्यक्ती‎ असताना लाखाच्या वर बिले दिले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जात आहे. तसेच बिल भरणा न‎ केल्यास वीज वितरण‎ कार्यालयाकडून विद्युत कनेक्शन‎ बंद केले जाते.

कुठल्याही प्रकारची‎ शहानिशा न करता विद्युत कनेक्शन‎ तोडले जाते. यामुळे सर्वसामान्य‎ नागरिकांची आर्थिक लूट केली‎ जात असल्याने यावर आळा‎ घालावा. अन्यथा तीव्र आंदोलन‎ करीत कार्यालयाला टाळे ठोको‎ आंदोलन करण्याचा इशारा या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ देण्यात आला. सुरळीत देय रक्कम‎ आकारणी करावी व जादा बिले‎ आलेल्या नागरिकांना सुरळीत बिल‎ आकारणी करून भरणा करून‎ घेण्यात यावे अशी मागणी करण्यात‎ आली आहे. या निवेदनावर संभाजी‎ ब्रिगेडचे धाराशिव जिल्हा संघटक‎ धनराज बिराजदार, लोहारा‎ शहराध्यक्ष पद्माकर चव्हाण, लोहारा‎ तालुकाध्यक्ष बालाजी यादव व‎ इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...