आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणाम:कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येसाठी मागणीचे निवेदन

वाशी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुका निर्मितीपासून येथील गटशिक्षणाधकारी कार्यालयात पुरेसे कर्मचारी देण्यात आलेले नाहीत. त्याच बरोबर जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना काही इजा झाल्यास प्रथमोपचार पेटी नाही. या दोन्ही मागण्या पुरविण्याचे निवेदन मंगळवारी ( दि.६) वाशी दौऱ्यावर असलेले राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांना देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ वाशी च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की वाशी तालुका निर्मिती ही मागील २० वर्षापूर्वी राज्यात असलेल्या युती सरकारच्या काळामध्ये झालेली आहे. तालुका निर्मितीनंतर तालुकास्तावरील कार्यालय म्हणून गटशिक्षण अधिकारी कार्यालय देखील सुरू करण्यात आलेले आहे मात्र इतक्या वर्षानंतर देखील कार्यालयात लिपिक व शिपाई ही दोन्ही पदे रिक्त आहेत. ज्याचा परिणाम स्वरूप शाळांची कामे करताना लीपिकाचे कामे ही शिक्षकांना करावी लागतात. त्याच बरोबर डाटा एंट्री ऑपेटर देखील पूर्णवेळ नसल्याने तंत्रस्नेही शिक्षकांकडून ती कामे केली जात असल्याने शिक्षकांना अध्यापन व कार्यालयीन कामे थांबवावे लागते.

विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याच बरोबर तालुक्यातील बहुतांश शाळा या अडमार्गी खेडेगाव, वाड्या वस्त्या वर आहेत. ज्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून मैदानावर अथवा शाळेत खेळताना विद्यार्थ्यांना शारीरिक इजा झाल्यास झाल्यास गावात, वस्तीवर दवाखाने उपलब्ध नसल्याने अधिकचा त्रास होतो. यासाठी तालुक्यासह संपूर्ण राज्यांमधील सरकारी शाळांमध्ये प्रथमोपचार पेटी उपलब्ध करावी जेणेकरून जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ प्रथमोपचार मिळती. निवेदन देताना शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संतोष मोळवणे, विठ्ठल माने, रणजीत कवडे, आऊब शेख, सिद्धेश्वर जाधव, राजकुमार गुंजाळ ,वाघीस स्वामी, निशिकांत सोनवणे, सिद्धेश्वर भालेकर, संगपाल सुकाळे, प्रशांत जाधवर, दत्ता कुंभार, विनय पांडव , कल्याण सुरवसे, बाबुराव माने, आसराजी कावळे,ज्ञानेश्वर जाणगेवाड, कैलास चौधरी, राजकुमार सरवदे, खुदुस सय्यद, शिवशंकर राऊत, प्रकाश नरसिंगे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...