आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:कोराळ ते सालेगाव रस्त्याच्या संदर्भात निवेदन

उमरगा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोराळ ते सालेगाव जुना शेत रस्ता अतिशय खराब झालेला आहे. शेताकडे जायला शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. रस्त्याचे तात्काळ काम मंजूर करुन डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी लोककल्याण संस्थेने सोमवारी (२०) तहसीलदार आणि जिप बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले.

कोराळ ते सालेगाव जुना हा रस्ता महसूल तसेच बांधकाम विभाग दप्तरी नोंद आहे. मात्र देखभाली अभावी रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. सदर शेतरस्ता नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निवेदनावर रवि दासमे, तुकाराम दळवे, अध्यक्ष विक्रम दासमे यांच्यासह शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...