आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार वाढीसह जिल्हयाच्या लौकिकात भर:भूममध्ये पर्यटनाला चालना मिळावी यासाठी निवेदन

भूम4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात हाडोंग्री, कन्हेरी घाट व इतर विविध ठिकाणे विकसीत करण्यात यावी, यासाठी सहयोग बहुउद्देशीय सामाजिक मंडळाचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. भूम येथील सहयोग बहुउद्देशीय सामाजिक मंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूम तालुका बालाघाटच्या डोंगर रांगात वसलेला आहे . उत्तर पुर्वेला असलेला बालाघाट डोंगर हा निसर्गाचे तालुक्याला मिळालेले वरदान आहे. यामध्ये माणकेश्वर येथील इतिहासकालीन हेमाडपंथी मंदीर , कुंथलगिरी येथील जैन धर्मियांचे पवित्र क्षेत्र असलेली मंदीरे, बेलेश्वर मंदीर यासह छोटमोठे पाणवठे हे पावसाळयात मनमोहक दिसतात. ही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत केल्यास रोजगार वाढीसह जिल्हयाच्या लौकिकात भर पाडणारी आहेत. तालुक्यातील हाडोंग्री मार्गावरील कन्हेरी घाट रस्ता हा महाबळेश्वरची आठवण करुन देणारा आहे.

तालुक्याला निसर्गाने लाभलेल्या या परिसरात वृक्ष लागवड व इतर विविध विकास कामाने विकसीत केल्यास राष्ट्रीय महामार्ग ५१ पासून अवघ्या ५ किलो मीटर अंतरावर असल्याने मोठया प्रमाणात पर्यटक भेट देतील. तसेच तालुक्यातील कुंथलगिरी येथे जैन धर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात जैन बांधव दर्शनासाठी येत असतात. या परिसरातील सोनगिरी साठवण तलावात बोटींगची व्यवस्था केल्यास पर्यटक भेट देतील. तसेच पखरुड येथील बेलेश्वर मंदीर असो की माणकेश्वर येथील हेमाडपंथी महादेव मंदीर , शिवखडा येथे डोंगरात वसलेल्या या मंदीर परिसरात निसर्गाचा मनसोक्त आनंद घेणाऱ्यासाठी मौजच आहे. तसेच तालुक्यातील खवा व पेढा महाराष्ट्रात प्रसिध्द आहे . यामुळे या व्यवसायासह इतर व्यवसायही भरभराट मिळेल.

तालुक्यात फळबाग लागवड वाढलेली असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाल्यास तरुण शेतकरी शेती प्रक्रिया उद्योगाकडे वळतील. तालुक्यातील कुंथलगिरी येथे पश्चिम महाराष्ट्रातून येणारा भाविक असल्याने तो छोटया मोठया व्यवसायासाठी ग्राहक ठरु शकतो . निसर्गाने नटलेल्या भूम तालुक्यातील या विविध भागांची प्रशासनाने दखल घेतल्यास तालुकाचा मागासलेपणाचा शिक्का पुसण्यास सहयोग होईल. त्यामुळे ही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करावी अशी मागणी सहयोग बहुउद्देशीय सामाजिक मंडळाचे फैजान काझी, अमर सुपेकर, अँड. सिराज मोगल ,संदीप ढगे, राजू साठे, राजेश चोबे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...