आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटारी:चेंबरवरील झाकणाची  दुरुस्ती करण्यासाठी निवेदन ; साफसफाई करण्याची केली मागणी

नळदुर्ग10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेंबरच्या झाकणाची दुरुस्ती करून विखुरलेल्या मातीच्या ढिगाऱ्याची विल्हेवाट लावून साफसफाई करावी अशी मागणी नळदुर्ग बस स्थानक समोरील व्यापाऱ्यांच्या वतीने नगरपालिकेत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्विस रोडच्या बाजूला गटारीचे काम न झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांच्या गटारीचा पाणी रस्त्यावर साचत असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे दुचाकीस्वार घसरून तसेच एकमेकाला धडकत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. त्यामुळे साचत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता नगरपालिकेच्या वतीने काही दिवसांपूर्वीच पाईपलाईन करून ठीक ठिकाणी चेंबर बसविण्यात आले होते. मात्र या ठिकाणी ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने आठ दिवसाच्या आतच चेंबरवर बसविण्यात आलेले झाकण तुटून पडले आहेत.

तसेच पाईपलाईन घालण्यासाठी जे खड्डे खोदण्यात आले होते. ते खड्डे पाईपलाईन झाल्यानंतर बुजविण्यात आले आहेत.मात्र उरलेली माती रस्त्यावर पडल्याने व चेंबरचा झाकण तुटल्यामुळे चेंबर मध्ये माती मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. चेंबर दिसत नसल्याने दुचाकी स्वार मोठ्या प्रमाणात घसरून पडत आहेत त्यामुळे दुचाकी स्वरांना दुखापत तर होतच आहे त्याचबरोबर वाहनांचे आर्थिक नुकसान होत होत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांचे वतीने करण्यात येत आहे.

निवेदनावर शेख गुलाम दस्तगीर, मोहन डुकरे, अहेमद शेख, दयानंद जाधव, भीमाशंकर बताले, अविनाश सातलगावकर, राजू मणियार, मिनाजोद्दीन इनामदार, अमुलाल शेख, अन्वर नदाफ, जाकीर शेख,अबू हूरेरा मौजन, मुनीर मौजन यांच्यासह इत्यादी जणांचे स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...