आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबरी चोरी:ईटकूर येथे भरवस्तीत दुपारी चोरी; 18 तोळे सोने लंपास

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ईटकूर येथील भर वस्तीत असणाऱ्या घरात दुपारच्या सुमारास घुसून जबरी चोरी केल्याची घटना घडली. माहितीनुसार माजी सैनिक भागवत दामोदर बोराडे हे ईटकूर येथील मांडवा रोडवर राहतात. ते जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. सकाळी ते ड्युटीवर गेले होते. त्यानंतर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पत्नी, मुलगा व सून हे दवाखान्यात गेले होते. डॉक्टर उशीरा आल्यामुळे त्यांना घरी येण्यास दुपार झाली.

ते दुपारी दोनच्या सुमारास घरी आले. यावेळी त्यांना घराच्या दरवाज्याचे कुलुप तुटलेले दिसले. घरात चोरी झाल्याचा त्यांना संशय आला. यामुळे त्यांनी घरात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना मुलाच्या बेडरुम मधील कपाट उघडलेले दिसले. सोन्याच्या दागिन्यांचे रिकामे बॉक्स बेडवर पडलेले दिसले. यामध्ये सुमारे १८ तोळे सोने चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरीची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नेहरकर, पोलिस कर्मचारी सुनील कोळेकर, तांबडे, जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. यउशीरापर्यंत कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...