आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विद्युत खांब उभारूनही अद्याप अंधार कायम; संभाव्य अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर काम करण्याची मागणी

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - पंढरपूर या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे शहरातील काम अंतिम टप्प्यात आहे. शहरात विद्युत पोल उभारण्यात आले असले तरी एलएडी लॅम्प चालू करण्यात आले नाही. त्यामुळे रात्री अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.शेगाव- पंढरपूर’ हा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. एकूण साडेचारशे किमी.पेक्षा जास्त लांबीच्या रस्ता असून ‘दिंडी मार्ग’ ठरणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गास मजुरी डिसेंबर २०१५ रोजी देण्यात आली होती.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून यातील केज ते कळंब- येरमाळा- कुसळंब या ६१ किलो मीटर च्या कामावर साडेचारशे कोटी रूपयांचे काम असून हे काम मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी करत आहे. अनेक ठिकाणी या रस्त्याचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी प्रगती पथावर आहे. कळंब येथील रिलायन्स पेट्रोल पंप ते येरमाळा या मधील २७ कि मी च्या आसपास चौपदरी रस्ते करण्यात येणार आहे. यातील २६ कि. मी. च्या आसपास काम झाल्याचे संबंधित अधिकारी सांगतात.

शेगाव- पंढरपूर रस्त्याचा भाग असलेल्या कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते परळी रोड, तर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी रोड असे दोन टप्यात चार किमी रस्ता करण्यात आले आहे. शहरातील दोन ठिकाणाचे थोडे काम रखडलेले आहे.

शहरातील केज रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप ते येरमाळा रोडवरील शासकीय विश्रामगृह या मधील रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये मेगा इंजिनिअरिंग कंपनी ने विद्युत पोल बसवलेले आहेत. त्याची वायरिंग बसवण्यात आली आहे. मात्र अद्यापही विद्युत कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यामुळे मागील कित्येक महिन्यापासून मुख्य रत्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

दिवे लवकर चालू करण्याची मागणी
शहरातील मुख्य रस्त्यावरील पोल वरील एलएडी बल्ब बंद असल्यामुळे वारंवार शहरात लहान सहान अपघात होत आहेत. त्यामुळे तात्काळ लाईट चालू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. पावसाळयात नागरिकांचे हाल होतात. याबाबत बोलताना संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुल गायकवाड म्हणाले की,शहरातील मेनरोड वरील पोल च्या लाईट बंद असल्यामुळे रात्री गाडी चालवणे अवघड जात आहे. तसेच वारंवार किरकोळ अपघात होत आहेत. त्यामुळे तात्काळ पोल वरील लाईट चालू करण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...