आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:राष्ट्रवादीचा ढोकीत रास्ता रोको‎

धाराशिव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२२ मध्ये सततचा पाऊस व‎ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे‎ नुकसान झाले. त्यासाठी राज्य‎ शासनाने मंजूर केलेले अनुदान‎ शेतकऱ्यांना द्यावे, हरभरा खरेदी‎ केंद्र तत्काळ सुरू करावीत,‎ कांद्याला प्रती क्विंटल एक हजार‎ रुपये अनुदान द्यावे, यासह विविध‎ मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे‎ जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील‎ दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली‎ ढोकी येथील साखर कारखाना‎ चौकात रास्ता रोको आंदोलन‎ करण्यात आले.‎ निवेदनात म्हटले आहे की,‎ जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक‎ संकटात मागील दोन वर्षांपासून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अडकले आहेत.

शासनाने‎ वेळोवेळी केलेल्या मागण्यांसंदर्भात‎ ठोस कारवाई केली नाही, यामुळे‎ संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या‎ विरोधात घोषणाबाजी केली.‎ राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दुधगावकर‎ यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी‎ मोर्चात सहभागी झाले. काही‎ वेळातच रस्त्याच्या दुतर्फा वाहने‎ उभी राहिली. पोलिस प्रशासनाने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गेल्या दोन दिवसांपासून या‎ परिसरातील गावांमध्ये पोलिस‎ पाटलांच्या माध्यमातून आंदोलनात‎ कोणीही सहभागी होऊ नये. जर‎ सहभागी झालात किंवा होण्यासाठी‎ गेला तर तुमच्यावर पोलिस कारवाई‎ करण्यात येईल, असा सज्जड दम‎ दिला गेला, शेतकऱ्यांना भयभीत‎ करण्यासाठी जमावबंदी लागू केली,‎ असा आरोप दुधगावकरांनी केला.‎

बातम्या आणखी आहेत...