आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शेतकऱ्यांना मदतीसाठी रास्ता रोको

तुळजापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट आर्थिक मदत करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि.१६) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सुमारे तासभर चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. संपूर्ण जुलै व सध्या ऑगस्टमध्ये सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, उडीद, तूर, मूग पाण्याखाली गेले. सुरवातीला गोगलगाईंचा हल्ल्या, त्यानंतर सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला.पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद यांनी यांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवला होता. जुन्या बसस्थानकासमोर तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रवींद्र इंगळे,उत्तम अमृतराव, किशोर गंगणे आदींनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टिका केली. मागण्यांचे निवेदन तालुका पुरवठा अधिकारी संदीप जाधव यांनी स्विकारले. यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...