आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राहुल गांधी यांना सक्त वसुली; मोदी, ईडीच्या प्रतिमेचे दहन करून निषेध आंदोलन

उमरगा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालनालय मार्फत (ईडी) तीन दिवसांपासून चाललेली कार्यवाही व केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात बुधवारी (दि.१५) त्यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध आंदोलन करण्यात आले. ईडीच्या वतीने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी चौक कॉर्नर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ईडीच्या प्रतिमेचे दहन करण्यात आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष संगीता कडगंचे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी, विधानसभा अध्यक्ष योगेश राठोड, माजी सभापती मदन पाटील, सचिन पाटील, रफिक तांबोळी, धनराज हिरमुखे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...