आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:जिल्हाभरात छात्रवीर संभाजीराजेंचा जयघोष; छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार, कार्यातून प्रेरणा घेत जयंती साजरी करण्याचे आवाहन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाभरात शनिवारी (दि. १४) शहरासह जिल्हाभरात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भव्य मिरवणुका काढून छत्रपती संभाजी राजे यांचा जयजयकार करण्यात आला.

परंड्यात अभिवादन
परंडा । छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६५ व्या जयंतीनिमित्त येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

काकासाहेब साळुंके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करून सामूहिक अभिवादन केले. याप्रसंगी देवानंद टकले, अंगद धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, तालुकाध्यक्ष समाधान खुळे उपाध्यक्ष सुहास ठोंगे, मराठा सेवा संघ तालुका उपाध्यक्ष विशाल पवार, पिंटू गटकूळ, शहाजी कोकाटे, राजाभाऊ रगडे, संदीप देशमुख आदी उपस्थित होते.

वाशी येथे अभिवादन
वाशी । छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती शनिवारी (दि. १४) शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन करण्यात आले. तालुक्यातील बावी येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम विष्णू शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी युवकांची उपस्थिती होती.

याप्रसंगी संभाजी भांडवले, संदीप हुंबे, संतोष मोळवणे, नगरसेवक कृष्णा गवारे, सचिन गवारे, सूरज नाईकवाडी, संकेत उंद्रे, प्रेम मोळवणे, रुद्र पाटील, स्वप्निल उंद्रे, सुमित चेडे, सुयश उंद्रे, अजय क्षीरसागर, गणेश उंद्रे, अनिकेत फाटक, समाधान जगताप, कृष्णा कवडे, अभि गायकवाड, महेश कवडे, दादा जगदाळे, प्रकाश मोळवणे, रोहित लगास, केदार पाटील, धनराज चेडे, सुदर्शन चेडे आदी उपस्थित होते. युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अवधुत क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने अभिवादन करण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अमर तागाडे, सुहास दळवी, समीर शेख, सुहास मोळवणे, अक्षय रजपूत, विशाल घोळवे, अमोल बोडके, समाधान जगताप, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...