आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाशी:देशभक्तीपर गीतांसह शेतकरी नृत्यांतून विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

वाशी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील अजिंक्य विद्यामंदिरात शुक्रवारी (दि. २९) विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

यामध्ये पारंपरिक गीते, लोकगीते शेतकरी नृत्य, देशभक्तीपर गीते, कोरोना महामारीत वैद्यकीय, पोलिस प्रशासनाने केलेल्या अतुलनीय कार्याबाबत नाटक, नक्कल, मुखाभिनयाद्वारे कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब चेडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महावीर कोटेचा, डॉ. पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका श्यामल कवडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आश्लेषा कवडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पल्लवी क्षीरसागर, सारिका जगताप, हरिश्चंद्र कदम यांनी केले तर स्वाती शिंदे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात श्रोते असलेल्या पालकांनी व शहरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव करत त्यांचे मनोबल वाढवले.

बातम्या आणखी आहेत...