आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निबंध स्पर्धा:विद्यार्थ्यांनी अध्यापन करून शिक्षक दिन साजरा केला ; 60 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहर नवोदय विद्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापनाचे कार्य करून शिक्षक दिन साजरा केला. यावेळी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांची माझे शिक्षक या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह, प्राचार्य निशांत जमाले व उपप्राचार्य संस्कार जोशी यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी अक्षय पवार यांनी भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार, त्यांचे कार्य सांगून जीवनामध्ये शिक्षकाची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे हे स्पष्ट केले. त्यानंतर बारावीतील सर्व विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापनाचे कार्य केले. बारावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प, पेन देऊन सत्कार केला. वर्ग सहावी मधील विद्यार्थ्यांची माझे आवडते शिक्षक या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या निबंध स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...