आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालयाची २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत शैक्षणिक सहल पंढरपूर, शिखरशिंगणापूर, गोंदवले, महाबळेश्वर, प्रतापगड, महाड, पाचाड (राजमाता जिजाऊ समाधी), रायगड, जेजुरी, माेरगाव गणपती आदी स्थळांची पाहणी करून विद्यार्थ्यांना सहलीत ऐतिहासिक, भौगोलिक, भाषा व सांस्कृतिक विषयावर आधारित बाबींचा विचार करून सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.बाबासाहेबांच्या समाज कार्याचा कविनी केलेला गौरव मराठी विषय शिक्षक तथा मुख्याध्यापक आर एम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून सादरीकरण केले. पंढरपूर येथे वारकरी संप्रदाय व संत साहित्य बाबत शिक्षिका श्रीमती एस एम मोरे यांनी माहिती दिली. यावेळी महाबळेश्वर या भौगोलिक माहिती अमोल जाधव. प्रतापगड रायगड व पाचाड किल्ला यांची ऐतिहासिक माहिती राहुल सोनवणेयांनी दिली.
पाठयपुस्तकात घटकांचा व घटनांचा सुसंवाद साधला. प्रत्येक घटना किंवा स्थळ व अभ्यासक्रम ज्ञानरचनावादावर आधारीत असतो त्याचे ज्ञान प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना यातून प्राप्त झाले.यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून इतिहासातील ऐतिहासिक स्थळांना भेटीतून इतिहासाची ओळख व्हावी आणि पाहणी करावी याकरिता क्षेत्रभेट किल्ल्यास भेट देण्यात आली.
या सहली दरम्यान किल्ल्यात विविध वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी त्यात प्रवेशद्वार, मेघडंबरी, तटबंदी, बुरुज, उपळी बुरुज, तोफा, खंदक, राणी महाल, पाणी महाल, टकमक टोक, जलाशय हिरकणी बुरूज इत्यादी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. राज्याचे शैक्षणिक दर्शन विद्यार्थ्यांना घडवून देण्यात आले आहे. केवळ निसर्गच नव्हे तर शैक्षणिक अभ्यासक्रमातील महत्वाच्या स्थळांना भेटी दरम्यान वैज्ञानिक प्रयोगशाळा, ऐतिहासिक स्थळे, भौगोलिक ठिकाणे दाखवून विद्यार्थ्यांना निसर्ग अभ्यासातून प्रत्यक्ष साधना करत नैसर्गिक स्थळांना भेटी देऊन ज्ञान वृध्दिंगत करण्यात आले.
प्रत्यक्षात किल्ले व समुद्र अशा स्थळांना भेट देऊन ऐतिहासिक व भौगोलिक भागांची प्रत्यक्ष अनुभुती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. शैक्षणिक सहलीसाठी शिक्षक ए जी जाधव, डी पी पवार व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. विविध परीक्षा तसेच शिष्यवृत्त्ी परीक्षांना विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींचा चांगला प्रतिसाद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.