आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंतीदिनी:डॉ.बापूजी साळुंखे यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत ; जयंतीदिनी विश्वास शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

उस्मानाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी उस्मानाबाद येथे महाविद्यालय स्थापन करून येथील तरुणांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याने आज उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षणाची जागरूकता झाली.या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेञात कार्य करत आहेत आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या जयंती दिनी त्यांचे विचार आत्मसात करावेत असे प्रतिपादन, विश्वास अप्पा शिंदे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या १०४ वी जयंती निमित्त ९ जून रोजी, प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले आहे. प्रारंभी मान्यवरांनी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे प्रतिमाचे पूजन केले. सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड (मराठी विभाग प्रमुख) म्हणाले की,डॉ.बापूजी साळुंखे यांनी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छोटे रोपटे लावले होते त्यांनी बहुजन समाजातील माणसांना शिक्षण देऊन सक्षम केले. ताज संस्थेचा विशाल वटवृक्ष झाला आहे.आजच्या शिक्षकांनी डॉ.बापूजी साळुंखे यांचा त्याग स्मरून कार्य करावे. अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य प्रा. डी.एम शिंदे म्हणाले की, डॉ. बापूजी साळुंखे एक ज्ञानतपस्वी होते राज्याच्या क्षैक्षणिक क्षेञात त्यांचे योगदान आहे. बहुजन समाजाला शिक्षण देऊन त्यांनी सक्षम बनवले आहे.त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. यावेळी उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती महाविद्यालयातील परिसर स्वच्छ, करून करण्यात आली यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,सेवक यांनी श्रमदान केले.आभार प्रा.डॉ.नितीन गायकवाड यांनी मानले.यावेळी शिक्षक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...