आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा १२ वर्गाचा निकाल चांगला लागला आहे. ज्यांनी अगोदरच कोणत्या शाखेत जाऊन कोणता अभ्यासक्रम निवडायचा हे निश्चित केले. त्यांना प्रवेश प्रक्रिया फारशी अवघड नाही. मात्र, ज्यांना कमी गुण मिळाले अथवा चाळणी परीक्षेत यश मिळाले नाही, तर अशांनी खचून न जाता विविध कोर्स करावे. सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम आहेत. पारंपारिक शाखांतील नवीन अभ्यासक्रमाकडे लक्ष द्यावे. त्याच बरोबर पदवीधर होत असताना ती डिग्री व्यावसायिक व तंत्रस्नेही (स्किल डेव्हलमेंटची) असली तर विद्यार्थी बेरोजगार राहणार नसल्याची माहिती व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी “दिव्य मराठी’ला दिली. बदलत्या काळानुसार पदवी शिक्षणातही आता व्यावसायिक शिक्षण मिळत आहेत. त्यासाठी विविध शाखांसाठी किती अभ्यासक्रम उपलब्ध आहे, याची माहिती तज्ञांनी सांगितली आहे.
कॉमर्समध्ये नवे पर्याय कॉमर्स शाखेत बारावीनंतर बी. कॉम व बी. बी. ए. यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारे पदवी प्राप्त करू शकतो. बी. कॉमध्ये १२ स्पेशल विषय तर बीबीएमध्ये ६ स्पेशल विषय आहे. सी.ए., आयसीडब्ल्यूए, सी.एस., बँकिंग फायनान्स, कन्सल्टंट, विमा, विपणन, जाहिरात, डिजिटल मार्केटिंग, इंपोर्ट, एक्स्पोर्ट यांसह वेगवेगळे असे २० हून अधिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेता येईल.
कला शाखेत अनेक नवीन संधी उपलब्ध कला शाखेच्या माध्यमातून बी. ए. त्यानंतर एम.ए. नेट-सेट, बी. एड. एम. एड अशा पद्धतीने पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त करू शकतात. भाषा विषयानंतर अनुवादक, लेखक तर मानसशास्त्र विषयानंतर समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ तर अर्थशास्त्र विषयातील पदवीनंतर अर्थिक सल्लागार म्हणूनही काम करू शकतो. भूगोल विषयात सर्व्हे, रिमोट सेन्सिंग, ह्युमन रिसोर्स, इतिहासामध्ये गाइडसह पर्यटन, राज्यशास्त्र, तत्वज्ञान, रिसर्च असिस्टंट, सामाजिक शास्त्रांमध्येही अनेक संधी आहेत. बीसीजेद्वारे पत्रकारिता व मास कम्युनिकेशन, ट्रॅव्हल व टुरिझम मॅनेजमेंट, ललित कला, चित्रकला, अभिनय अशा विविध क्षेत्रात संधी आहे. स्पर्धा परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी कला शाखेतून प्रविष्ट होतात.कारण त्याला त्याच्या वाचन आणि लिहिण्याच्या वृत्तीचा फायदा होतो. त्याचे वाचन सर्वंकष असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.