आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात जकेकुरवाडी जिल्हा परिषद शाळेत बुधवारी थोर शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांची जयंती साजरी झाली. न्यूटन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बालाजी दुधनाळे यांच्या हस्ते झाले. शिक्षक रघुवीर आरणे विद्यार्थ्यांना आयझॅक न्यूटन यांच्या कार्याची देताना म्हणाले की, गणिताचे शिक्षक न्यूटन यांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होते. न्यूटन यांनी प्रकाश, गतीचा शोध लावला. गणितात संशोधन केले. न्यूटनने सांगितले की पांढरा रंग इंद्रधनुष्यातील सात रंगांचे एक मिश्रण आहे. पहिली सर्वात मोठी उपलब्धी प्रतिबिंबित टेलिस्कोपच्या रूपात झाली.
रॉयल सोसायटीनेत्यांना प्रतिबिंबित टेलिस्कोप प्रदर्शन करण्यास सांगितले. त्यास गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असे म्हटले जाते. न्यूटनचे गतीविषयी नियम, वस्तूमान वेग बदलण्याचा नियम आणि क्रिया प्रतिक्रिया नियमाचे शोध लावले. यावेळी शिक्षक बालाजी कदम, प्रमोद साखरे, अमिता वाघवसे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रमोद मोरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
फळ झाडावरुन खालीच का पडले ?
आरणे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, न्यूटन एके दिवशी गावातील बागेत बसून काहीतरी विचार करत होते. झाडावरून एक फळ खाली पडले. त्या फळाला हातात धरून विचार करू लागले की हे फळ खालीच का पडले, वर आकाशात का नाही गेले? त्यांनी ही गोष्ट अनेक लोकांना विचारली आणि ते सांगू लागले की पृथ्वीवर अशी शक्ती कार्यरत आहे जी या फळाला खाली खेचत आहे. परंतु त्यांच्या या गोष्टीला कोणीही गंभीरपणे घेतले नाही.
दीर्घकाळपर्यंत अभ्यास करत शेवटी न्यूटनने सूर्याच्या चारही बाजूंना फिरणाऱ्या ग्रहांच्या संबंधात गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला. त्यांनी सांगितले की, समुद्रात येणाऱ्या लहरी, चंद्र, सूर्य, पृथ्वी, ग्रह हे सर्व एका शक्तीच्या सहाय्याने कार्य करतात. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती असे नाव दिले. न्यूटनने गुरुत्वाकर्षण सिद्धांतात सांगितले आहे की दोन वस्तू एक दुसऱ्याला केवळ गुरुत्वाकर्षणाच्या बळावर आकर्षित करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.