आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिश्रम:विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतल्यास नोकरीसाठी ठरतील सक्षम; आमदार सतीश चव्हाण यांचे मत

लोहारा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या देवगिरी पॅटर्नच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी नोकरी करण्यास सक्षम ठरतील, असे मत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी केले.

येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात शुक्रवारी (दि.१७) बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार चव्हाण बोलत होते. ते म्हणाले की, भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील दरवर्षी २५ हुशार, होतकरू, विद्यार्थ्यांची निवड करून हुबळी येथील देशपांडे फाऊंडेशनमध्ये ट्रेनिंगला पाठवू. त्यांचा ट्रेनिंगचा खर्च मी स्वतः करणार आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा. जे शिक्षण शहरात खर्च करून मिळते. ते शिक्षण आपण लोहारा सारख्या ग्रामीण भागात देण्याचा प्रयत्न करत आहोत. याचा लाभ ग्रामीण भागातील मुला- मुलींनी घ्यावा. जे विद्यार्थी कठोर परिश्रम करून अभ्यास करतील.

कार्यक्रमास प्रा. सतीश इंगळे, औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नंदकिशोर गायकवाड, डॉ. मनिषा नाईक, प्रा. सादिया शेख, डाॅ. किरण पतंगे, भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य दौलतराव घोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिपाली महादेव पाटील, धनश्री ओमकार कुंभार, सुमती रवींद्र माने, सानिका इराप्पा बादुले, धनश्री सुभाष रणखांब, भाग्यश्री वैजीनाथ माटे, श्रेया सतीश वैरागकर, साक्षी दिपक गिल्डा, वैष्णवी विजय घाडगे, मदिहा खालिद चाऊस, सुषमा विक्रम गोरे, हणमंत दयानंद कुंभार आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सानिका बादुले आणि धनश्री रणखांब यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत चंदनशिवे यांनी तर सुहानी मडुळे हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.अभिजीत सपाटे, प्रा. राहुल मोरे, प्रा. मल्लिनाथ चव्हाण, प्रा. स्वाती माने, प्रा. सुनंदा सूर्यवंशी, प्रा. रत्नमाला पवार, प्रा. स्नेहलता करदुरे, प्रा. अंजली पटवारी, अरविंद हंगरगेकर, नवनाथ वकील, बालाजी जगताप, स्वागत जगताप, विक्रम जगताप आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...