आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेश वाटप:विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके, गणवेश; तालुक्यात 27 हजार 424 विद्यार्थ्यांना होणार वितरण

उमरगा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शाळा सोमवारपासून (दि.१३) सुरू होणार असून शिक्षण विभागाकडून पहिलीपासून ते आठवीपर्यतच्या विद्यार्थांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश पहिल्या दिवशी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील विद्यार्थी संख्येप्रमाणे सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध झाले असून केंद्रानिहाय शाळांना पुस्तके वितरण करण्यात आली असून तालुक्यातील जिल्हा परिषद १५१ व खासगी अनुदानित असलेल्या ५३ शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. गटशिक्षण कार्यालयात मराठी, सेमी इंग्रजी व ऊर्दू माध्यमातील पुस्तके उपलब्ध झाली होती. शिक्षण विभागाने १२ केंद्राच्या माध्यमातून एकूण २७ हजार ४७२ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पहिल्या दिवशी वाटप करण्याचे नियोजन केेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...