आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांशी भेट:उपविभागीय अधिकाऱ्याची सुकटा येथे शेतकऱ्यांशी भेट

सुकटा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी सुकटा येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद ही साधला. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्यांचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या शासनाच्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच येथील आत्महत्याग्रस्त कुंटूंबाची भेट घेऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

तालुक्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार असल्याने उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी महिन्यातून एक दिवस या उपक्रमांतर्गत गावांना भेटी देणार आहेत. शेतकऱ्यांना आपल्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडून सोडवणूक करून घेता येणार आहे. नवीन योजनांची व तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. यावेळी नायब तहसिलदार प्रमोद सावंत, विस्ताराधिकारी व्ही.जे. वाघमारे, कृषि मंडळ अधिकारी निखील रायकर, बी.व्ही. शिंदे, तलाठी एल. एम. कांबळे, निशिकांत गाढवे,ग्रामसेवक लवटे, शिवाजी भडके, पोलिस पाटील अमोल आठवले, शहाजी भडके महेश लांवड, ईश्वर अर्जुन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...