आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:बाधित शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतींमध्ये डकवा ; राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै महिन्यापासून झालेली अतिवृष्टी, सततचे पर्जन्यमान, गोगलगाई, यलो मोझॅक व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात ३३ टक्के पेक्षा जास्त पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेली यादी ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पात्र असलेल्या बाधित शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच नावे नसल्यास तहसीलदारांकडे अर्ज करून पोहोच घ्यावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

ते म्हणाले की, ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे. १५ सप्टेंबर २०२२ पासून अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून पंचनामे झालेली यादी ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व सरपंचांनी पंचनामा झालेल्या पात्र असलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त करून ग्रामपंचायतीच्या फलकावर डकवाव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांना आपली नावे त्यामध्ये असल्याची खातरजमा करता येईल. पात्र असलेल्या परंतु यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करून त्याची पोहोच घ्यावी असे आवाहनही पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...