आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील तेर परीसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक हरभरा पिकाच्या पेरणीला बगल देत राजम्याचा पर्याय निवडला असून तेर परीसरातील शेकडो एकरवर याची पेरणी केली आहे. राजमा हे पीक रब्बी हंगामात येणारे पीक असून केवळ ८० दिवसात येणारे हे पीक असून कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक असल्याने शेतकरी हरभरा पिकाला पर्याय म्हणून राजमा पिकाकडे वळला आहे. राजमा हे पीक ८० दिवसात परिपक्व होत आहे.वजनातही हरभरा पिकापेक्षा वजनदार असल्याने साधारण ६५ ते ७० किलो वजनाचा कट्टा भरत असल्याचे शेतकऱ्यांचा अंदाज आहे.हरभरा पिकाच्या तुलनेत खर्च व वेळ त्याचप्रमाणे फवारण्याही कमी लागतो .यंदा प्रथमच तेर परिसरातील शेतकऱ्यानी राजम्याची पेरणी केली आहे.
कमी खर्चात जास्त उत्पन्न
राजमा पिकावर पडणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कमी खर्चाचे औषधी फवारणी करावी लागते. करपा रोगाचा सामना या पिकाला करावा लागतो. त्यामुळे बुरशीनाशकांसारखे औषध फवारणी कमी खर्चात होते. कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे राजमा हे पीक असल्याने हरभरा पेरणी ऐवजी राजमा पिकांची पेरणी केली. -धनंजय जाधव, शेतकरी, तेर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.