आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:धुणे-भांडी करत मुलीने मिळवले यश; 17 नंबर अर्ज भरून, 77 टक्के गुण मिळविले

उमरगाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काळ निंबाळा येथील रहिवाशी असलेली अंजली मंगलबाई ब्याळे यांची आर्थिक परिस्थिती बिकट त्यात सातत्याने आई-वडीलामध्ये होणारे वाद यामुळे प्रकरण न्यायालयात गेल्याने मंगलबाई ब्याळे यांनी दोन मुली व एक मुलगा घेऊन माहेरी उमरगा शहरात वास्तव्यास आली. शिक्षण घेण्याची जिद्द असलेल्या अंजली हिच्या आयुष्यात आजोळीही संघर्ष सुरू झाला. शिक्षण बंद करून पाच वर्षानंतर १७ नंबर अर्ज भरून दहावी परीक्षेत ७७ टक्के गुण मिळविले.

मंगलबाई ब्याळे हॉटेलमध्ये स्वयंपाकास जावू लागल्या. मोठी मुलगी अंजली आठवी वर्गात होती. आई कामाला जात असल्याने लहान बहीण व भावाचा सांभाळ करण्यासाठी अंजलीचे शिक्षण बंद झाले. घर सांभाळत अंजली आईला मदत म्हणून घर काम करायला सुरुवात केली. तिला शिक्षण घेण्याची मोठी इच्छा परंतु घरातील पाच जणांचा आर्थिक भार एकट्या आईच्या कमाईवर भागत नसल्याने अंजलीने धुणी-भांडी करून कुटुंबाला हातभार लावण्यास सुरू केले.

श्रीमती अंबर यांनी अंजलीला बोलावून घेत विचारले असता शिक्षणाची आवड लक्षात आल्यावर घरकामात वेळ काढत अंजलीला बोलावून बेसिक तयारी करून घेतली. महेश अंबर यांनी ही अंजलीच्या शिक्षण घेण्याची जिद्द पाहून दहावीची परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहीत केले.यामुळे ती यशस्वी झाली.

कुटुंबाचा आधार बनण्याची इच्छा आहे
कौटुंबिक परिस्थितीमुळे आठवीत असताना शिक्षण बंद करावे लागले. शिक्षण घेण्याची इच्छा होती, मात्र आर्थिक व कौटुंबिक स्थिती नसल्याने धुणीभांडी करून आईला मदत करीत होते. लहान भाऊ पाचवीत, बहीण तिसरीत असून दहावीची परीक्षा देईन अशी कल्पना व आशा नव्हती. ॲड तोतला, प्राचार्य डॉ. माळी आणि अंबर दांपत्यामुळेच हे शक्य झाले आहे. आता पुढील शिक्षण घेऊन कुटुंबाचा एक आधार होण्याची ईच्छा आहे.
अंजली मंगलबाई ब्याळे, विद्यार्थिनी