आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा:एमबीबीएस परीक्षेत यश; डॉ. श्वेता मानेचा सत्कार

उमरगा2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कुमार स्वामी प्राथमिक शाळा, शरणप्पा मलंग विद्यालयाच्या वतीने डॉ. श्वेता माने यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याने सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक अजित गोबारे, कुमारस्वामी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी, सहशिक्षिका सरुबाई स्वामी, मीनाक्षी जाधव, सत्कारमूर्ती डॉ. श्वेता सुदेश माने उपस्थित होते. शिक्षिका मीनाक्षी जाधव यांची कन्या श्वेता सुदेश माने हिने नुकतीच एमबीबीएस पदवी मिळवून डॉक्टर झाल्याबद्दल डॉ. श्वेता माने व आई मीनाक्षी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक अजित गोबारे म्हणाले की, श्वेता माने यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्याचा सार्थ अभिमान आहे. श्वेताच्या यशासाठी आई मीनाक्षी जाधव, वडील सुदेश माने अपार कष्ट केले. विद्यार्थ्यांनी डॉ. श्वेता हिच्याकडून प्रेरणा घ्यावी. ध्येय साध्य करताना कठीण परिस्थितीत जिद्द व चिकाटीच्या जोरावर नक्कीच यशापर्यंत पोहोचू शकतो. डॉ. श्वेता म्हणाल्या, कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर अनेक अडचणी येत असतात. स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकू की नाही अशी शंका निर्माण होते, परंतु चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य, ठरवलेले ध्येयापासून विचलित न होणे, त्यासाठी कष्ट घेणे, दिवस-रात्र एक केल्यास नक्कीच यश मिळते. सहशिक्षक परमेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन केले. कविराज रेड्डी यांनी आभार मानले.

विविध संस्थांकडून सत्कार
श्वेता सुदेश माने हिने नुकतेच भारती विद्यापीठ पुणे येथून एमबीबीएसची पदवी मिळविल्याबद्दल मुख्याध्यापक तथा हायस्कूल सोसायटीचे चेअरमन पद्माकर मोरे, प्रा. डी. व्ही. फुगटे, हायस्कूल टिचर्स सोसायटीचे संचालक श्रीमंत जाधव, अर्जुन भुसार, ममता गायकवाड यांच्या वतीने श्वेता हिचा सत्कार करण्यात आला. डॉ. श्वेता हिचे दहावीपर्यंत शिक्षण शहरातील आदर्श विद्यालय तर माध्यमिक शिक्षण लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातून झाले.

बातम्या आणखी आहेत...