आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांचे यश:दहावीत लिटिल फ्लॉवर्स मराठी, डोमगाव, सावरगाव शाळांचे यश ; जिल्हा परिषद प्रशालेचा शंभर टक्के निकाल

तुळजापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लिट्ल फ्लॉवर्स मराठी शाळेचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून रिहान जहीर सय्यद हा ८७.४५ गुण घेऊन प्रथम, सोहेल सत्तार पटेल ८६% टक्के गुण घेऊन द्वितीय तर रितेश श्रीकांत पांडागळे हा ८५.८० % गुण घेऊन तृतीय आला आहे. शाळेतील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

असून ६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. आर. मलबा, उपाध्यक्ष माधव कुतवळ, सचिव सुरेश दिक्षीत आदींनी अभिनंदन केले आहे. डाेमगाव कल्याणसागर विद्यालय परंडा तालुक्यातील डोमगाव येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाची सलग तीन वर्षे १०० टक्के यशाची परंपरा कायम ठेवली आहे. डोमगाव येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विशेष प्राविण्यासह २१ विद्यार्थी उत्तीर्ण असून प्रथम श्रेणीत १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये अंकिता मिस्किन ९०.४०, नेहा खैरे-८९.२०, रेणुका बेलसरे ८७ टक्के तीन विद्यार्थिनींनी अनुक्रमे विद्यालयामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकुर, संस्थेच्या सचिवा प्रज्ञा कुलकर्णी, मार्गदर्शक विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकुर, चंद्रकांत पवार, किरण गरड, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

सावरगाव जि.प. प्रशाला तुळजापूर तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रशालेतील मुलींनी बाजी मारली आहे. यात अश्विनी दत्तात्रय ठेले ९४, पूजा काशीनाथ डोके ९३ टक्के, दीक्षा गुरुनाथ स्वामी ९२ टक्के, तन्वी यशवंत कुलकर्णी ९० टक्के या विद्यार्थिनींनी यश मिळवले. तर प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला.यासाठी मुख्याध्यापक वाघ, पाथरूड, धोत्रे, राहुल सुरवसे, गायकवाड व इतरांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...