आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहाने यश मिळवले आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने २ ते ३ डिसेंबर दरम्यान दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयाेजन उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियमवर केले हाेते.
या स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, ग्रामीण विकास प्रकल्पाच्या प्रकल्पधिकारी पी. पी. शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौघुले यांचे हस्ते झाले.
लाेकनाट्य कला स्पर्धेतही यश
सांस्कृतिक स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह उस्मानाबाद येथील नाट्यगृहात घेण्यात आल्या. मतिमंद प्रवर्गातून सांस्कृतिक स्पर्धेमध्ये ‘लोकनाट्य’ या कला प्रकारावर सामूहिक नृत्य सादर करून दुसरा क्रमांक मिळवला.
पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद, समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौघुले यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. विजयी स्पर्धकांचे काैतुक संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक गुरुनाथ थोडसरे, कार्यशाळा व्यवस्थापक निकिता माने, सर्व कर्मचाऱ्यांनी केले. तसेच बालगृहातील सर्व मुली अनाथ असून त्या मतिमंद असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
विविध गटांमध्ये स्पर्धा, ६०० मुलामुलींचा उत्साही सहभाग
या स्पर्धा मूकबधिर, अस्थिव्यंग, मतिमंद, अंध प्रवर्गामध्ये घेण्यात आल्या. जिल्ह्यातील दिव्यांगाच्या सर्व शाळांमधून चार प्रवर्गातील ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते. दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगांव संच.
स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह विमानतळ रोड आळणी येथील विद्यार्थिनीने विविध क्रीडा प्रकारात नेत्रदीपक कामगिरी केली. जिल्ह्यातून मतिमंद प्रवर्गातून क्रीडा स्पर्धेत याही वर्षी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा चॅम्पियन ट्रॉफी मिळवण्याचा मान मिळवला. क्रीडा स्पर्धेत एकूण सुवर्ण पदक - २०, कास्य पदक - १९, रौप्य पदक - २० मिळवून यश संपादन केले. राज्यस्तरीय होणाऱ्या दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेसाठी बालगृहातील २० मुलींची निवड करण्यात आली आहे.
२०१९ मध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावरील मतिमंद प्रवर्गाचे तृतीय पारितोषिक या बालगृहास मिळाले आहे. क्रीडा स्पर्धेत ८ ते १२ वयोगटातून आरती- लगोर फोडणे व बादलीत बॉल टाकणे प्रथम. १३ ते १६ वयोगटातून रुपाली- स्पॉट जंप व १०० मी धावणे प्रथम, संजना विश्वकर्मा- गोळा फेक प्रथम, बसंती- बादलीत बॉल टाकणे प्रथम.
१७ ते २१ वयोगटातून लक्ष्मी रंजनकुमार सिन्हा- लांब उडी प्रथम, भावेश्वरी- १०० मीटर धावणे प्रथम, पुनम पवार- गोळा फेक प्रथम, मुस्कान सुलतान खान- २०० मीटर धावण्यात प्रथम, माधवी मोहन पवार- ५० मीटर पोहणे, मिनल- २५ मीटर चालणे प्रथम, संगीता भैरू पवार- बादलीत बॉल टाकणे प्रथम, नेहा- २५ मीटर पोहणे प्रथम. २१ ते २५ वयोगटातून स्वाती- १०० मीटर धावणे प्रथम, अंजू २०० मीटर धावणे प्रथम, सोनु- गोळा फेक प्रथम, वणी- ५० मीटर पोहणे प्रथम, राणी कल्याणसिंग उनाटे- २५ मीटर चालणे, दुर्गा- बादलीत बॉल टाकणे प्रथम आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.