आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेचे आयोजन:निबंध स्पर्धेत तुरोरी येथील ज्ञानेश्वर विद्यालयाचे यश

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निंबध स्पर्धेत तालुक्यातील तुरोरी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाची मानवी ज्ञानेश्वर जाधव हिने राज्यात दुसरा तर प्रतिक्षा बिराजदार हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून यश मिळविले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल मुख्याध्यापक एन. एम. माने, उपमुख्याध्यापक बी एस जाधव, पर्यवेक्षिका एस. एम. आहिरे, शिक्षक अभिजित जाधव, संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव जाधव, सचिव सि एन भातलोंढे यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक एच व्ही पवार, सि पी गठ्ठडे यांचे अभिनंदन केले. शिक्षक श्री पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ जी. व्ही. मुगळे यांनी आभार मानले. यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...