आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:वेटलिफ्टींग स्पर्धेत जगदाळे महाविद्यालयाचे यश

वाशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश संपादन केले आहे.महाविद्यालयाच्या कनिष्ठ शाखेत असलेल्या प्रतीक गोकुळ मोटे व श्रीराम बाळासाहेब येडे या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत अनुक्रमे ८९ किलो वजनी गटात ९० किलो व ६१ किलो वजनी गटात ८८ किलो वजन उचलून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविले.

सोमवारी ( दि.५) नांदेड येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत प्रतीक मोटे याने ८९ किलो गटात लातूर विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय साठी पात्र ठरला आहे. विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यासाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र कठारे यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा शिक्षक शशिकांत सरवदे यांच्यासह सर्व प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...