आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूलचे यश:खंडेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत खंडेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.तिसाव्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२२-२३ मध्ये खंडेश्वर स्कूलचे विद्यार्थ्यांनी शहराचे वैभव असणाऱ्या भुईकोट किल्ल्याची सत्य परिस्थिती या प्रकल्पाद्वारे मांडली आहे. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये साचलेल्या पाण्याचे आरोग्यावर होणारे परिणाम या विषयावर प्रकल्पाचे सादरीकरण केले होते.

प्रयोगाची राज्यस्तरीय निवड झाली आहे. संस्थापक नवनाथ खैरे, सुनील कांबळे ,बाळासाहेब काळे यांचे विज्ञान समन्वयक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. मुख्याध्यापक संजय जाधव तसेच संचालिका रोहिणी सातपुते यांनी श्रेया सातपुते व अवेज मुजावर आदीनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सागर खैरे व संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षक प्रियांका डिसले, अर्चना बनसोडे , भिमाशंकर विभुते, अंकुश पोळ, निकिता आगरकर, राधा काकडे , सोनाली लाडे, समिना सय्यद , मंजूषा भांगे, माया साबळे, दिपाली मोरे, श्याम जाधव, उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...