आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युपीएससी:किल्लारीतील युवकाचे युपीएससीत यश ; कोरोनामुळे दिल्ली सोडावी लागली होती

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंजिनिअररिंगची पदवी घेतल्यानंतर यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत गेलो. पहिल्या प्रयत्नान यश आले नाही म्हणून निराश झालो नाही. त्यात कोरोनामुळे दिल्ली सोडावी लागली. औशात रात्रंदिवस अभ्यास करीत १४९ वी रँक मिळवत अखेर यशाला गवसणी घातली. किल्लारी येथील रहिवासी, नारंगवाडी (ता. उमरगा) येथील आजोळ असलेले, सध्या औसा (ता. लातूर) येथे वास्तव्यास असलेल्या शुभम भोसले यांनी यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. वडील संजय भोसले शिक्षक असून, आई गृहिणी आहे. संजय भोसले यांचे सुपुत्र शुभम भोसले यांनी केलेले कष्ट, ध्येय अखेर सार्थकी लागल्याचे पाहताना आई-वडील यांनाही गलबलून आले. शुभम यांच्या यशामुळे लातूर गुणवत्तेची ओळख पुन्हा देशपातळीवर अधोरेखित झाली. किल्लारी (ता. औसा) येथील शुभम भोसलेचे वडील वानवडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक, आई गृहिणी आहे. शुभमचे प्राथमिक शिक्षण औशाच्या मुक्तेश्वर विद्यालयात झाले. दहावी एनटीएस परीक्षेत जिल्ह्यात दुसरा आला आणि शालान्त परीक्षेत ९८ टक्के गुण मिळाले होते.

बातम्या आणखी आहेत...