आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:दिवंगत अशोक कोकाटेंच्या संघटनात्मक कार्याचे यश ; अनिल सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

भोकरदन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तलाठी पदावर नियुक्त झालेली व्यक्ती टप्प्याटप्पाने नोकरीच्या कार्यकाळात तलाठ्यापासून ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचू शकते हेच संघटनात्मक कार्य तलाठी संघटनेेचे माजी राज्याध्यक्ष कै अशोक कोकाटे यांचे तलाठ्यांसाठी खूप मोलाचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी भोकरदन येथे कोकाटे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात केले.

यावेळी व्यासपीठावर मराठवाडा विभागाचे सतीश भदाणे, औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय साळवे, सरचिटणीस जरारे, वाघ, जालना जिल्हाअध्यक्ष भाेरे, सरचिटणीस गणेश कुलकर्णी, उपाध्यक्ष अनिल उफाड, जाफराबादचे तहसीलदार केशव डकले, संजय कोकाटे, के. डी. सोनवणे, सुरेश तळेकर यांची उपस्थिती होती. सूर्यवंशी यांनी अशोक कोकाटे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या राज्याध्यक्षपदाच्या कार्यकाळात तलाठ्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले जे तलाठी नियुक्ती पासून केवळ गिरदावर या पदापर्यंत पोहोचून निवृत्त होत होते त्याच तलाठी संवर्गातील व्यक्ती आता तलाठी पदापासून ते मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पदोन्नतीने पोहोचत आहेत हेच सर्व राज्यातील तलाठी संवर्गातील व्यक्तींसाठी अशोक कोकाटे यांचे संघटनेच्या माध्माद्वारे केलेलें मोलाचे कार्य आहे.यावेळी भोकरदन तालुकाध्यक्ष बि. एस. सोनवणे, जाफराबाद अध्यक्ष बी. एम. काकड यांच्यासह भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील तलाठी, महसूल कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...