आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिकदृष्टया दुर्बल घटक:नरेंद्र आर्य विद्यालयाचे यश, दोघींना राष्ट्रीय शिष्यवृत्ती ; विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

तुळजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयातील अन्नपूर्णा सुवर्णकार व श्वेता प्रशांत गुरव या विद्यार्थिनी राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. या दोन्ही विद्यार्थिनींना पुढील ४ वर्षे दरवर्षी १२ हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नरेंद्र आर्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यात ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सांजेकर, उपाध्यक्ष भारत तोडकरी, माजी आ. नरेंद्र बोरगांवकर, सचिव शंकर गोरे, आदित्य बोरगांवकर, विनय भोसले, कल्याण तोडकरी, श्रीमती ज्योती सांजेकर, मंदार रोहिणकर उमेश भोसले, मोहन लोके आदींनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या या परीक्षांमध्ये जिल्हयातील विविध शाळांचे विद्यार्थी उतरले होते.

बातम्या आणखी आहेत...