आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:शेंडगे इंग्लिश स्कूलच्या समृद्धी‎ पवारचे राष्ट्रीय योंगमुडो स्पर्धेत यश‎

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच नांदेड येथे झालेल्या सातव्या‎ राष्ट्रीय योंगमूडो स्पर्धेत डॉ. के. डी. शेंडगे सीबीएसई‎ इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी कु.समृद्धी रणजीत पवार‎ हिने सुवर्णपदक पटकावले आहे. योंगमुडो‎ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने नांदेड‎ येथील क्रीडा संकुलमध्ये २७ जानेवारी ते २९ जानेवारी‎ कालावधीत सातव्या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन‎ करण्यात आले होते.

महाराष्ट्र , कर्नाटक , तमिळनाडू‎ , गुजरात , केरळ , आंध्रप्रदेश , तेलंगणा दिल्ली ,‎ पॉण्डेचेरी राज्यातील जवळपास साडेतीनशे खेळाडूनी‎ भाग घेतला होता. मुलांच्या व मुलींच्या गटामध्ये १४,‎ १७, १९ वर्षाखालील तसेच खुल्या गटात व विविध‎ वजन गटामध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. या स्पर्धेत‎ समृद्धी पवार हिने सुवर्णपदक मिळविले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...