आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश; चौथीच्या विद्यार्थ्यांनी तेर केंद्रात प्रथम क्रमांक

तेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथील आयडीयल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवले आहे. शाळेतील दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी तेर केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला.

इयत्ता दुसरीतील प्रशिक वाघमारे, इयत्ता तिसरीतील सृष्टी उंबरे, चौथीतील संबोधी वाघमारे हे विद्यार्थी तेर केंद्रात प्रथम आले आहेत. तेर केंद्रातून इयत्ता तिसरीतील अमृता शिंदे व चौथीतील श्रृती उंबरे यानी दुसरा क्रमांक मिळवला. पहिलीतील स्वरा चौरे, नक्षत्र शेंडगे, समर्थ चव्हाण, दुसरीतील मयुरेश्वर कानाडे, तिसरीतील सई करनावर, स्वराली गोरे, चौथीतील सई सावंत, वरद कोटे, गायत्री गोरे, आदेश शिंदे, पाचवीतील श्रीनिवास उंबरे, हर्षल भालेराव, अंकिता इंगळे यांनी यश मिळवले.

या विद्यार्थ्यांना उमा वाघमारे, मीनाक्षी लोमटे, धनश्री कटकटे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या वैशाली अडसूळ, संस्थेचे सचिव अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...