आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:भूम येथे  गुरुदेव दत्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे बुद्धीबळ स्पर्धेत यश

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गुरुदेव दत्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत यश मिळविले आहे. तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटातून ओम मुंडे याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच १७ वर्षे वयोगटातून यशवंत डोंगरे या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक मिळविला.

या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कॅप्टन अजय मनसुके, माजी मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आप्पा मिसाळ व जयंत शिदे यांचाही सत्कार प्रशालेचे पर्यवेक्षक सतीश देशमुख यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...